Latest News

6/recent/ticker-posts

"मतदानापुरते जनता हद्दीत मतदानानंतर पांदित", औसा हद्दीबाहेरील जनतेची दयनीय अवस्था

"मतदानापुरते जनता हद्दीत मतदानानंतर पांदित", औसा हद्दीबाहेरील जनतेची दयनीय अवस्था



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि.१६ - औसा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. असे असताना विस्तारित क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पुरवण्याची सर्वस्व जबाबदारी नगरपालिकेची असताना याकडे हादीचा प्रश्न समोर करून बऱ्याच सोयीसुविधांपासून येथील नागरिकांना दूर ठेवण्यात येत आहे. मागील अनेक वर्षापासून औसा शहराची हद्दवाढ प्रश्न प्रलंबित आहे. वेगवेगळ्या पक्षाची सत्ता याठिकाणी आली मात्र कोणत्याही पक्षाने जातीने लक्ष दिलेले नाही .फक्त मतदाना पुरते तुमचा भाग हद्दीत घेऊ ,तुम्हाला वेगवेगळ्या सोयीसुविधा पूरवु अशी वरवरची वचने देऊन जनतेला भ्रमात ठेवून त्यांचा वापर फक्त मतदानासाठी केला गेला. मात्र त्यांना दिलेली वचने कोणत्याही पक्षाने आज पर्यंत पूर्ण केलेली नाहीत.


मागील अनेक वर्षापासून प्रसारमाध्यमे या बाबतीत प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र कोणालाही याची काळजी नसल्याचे दिसून येते.


प्रत्येक पावसाळ्यात येथील रस्ते चालत जाण्या योग्य देखील राहात नाहीत .वाहन घेऊन जाण्याचा प्रश्न दूरचा आहे.


अनेकांनी स्वतःच्या खर्चातून विद्युत खांब लावले आहेत. एक वर्षापूर्वी काही ठिकाणे विद्युत खांबाची व्यवस्था केली गेली.


बऱ्याच ठिकाणी नळाच्या पाण्याची सुविधा नाही.


हादि बाहेरील भागात फिरत असताना असे वाटते की आपण कुठे पांदित तर फिरत नाहीत ना. या संबंधी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शेख जावेद यांना विचारले असता" हदवाढ संदर्भात येथील काही लोकांनी तक्रार नोंदवली होती; ती आता दूर झाली आहे. या ठिकाणचा निकाल हा हद्दवाढ योग्य या बाजूने दिला गेला आहे. हद्दवाढीचे फाईल मंत्रालयात गेली आहे. लवकरच हद्दवाढीचा प्रश्न मिटेल व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील"अशी प्रतिक्रिया इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


 सद्यस्थिती या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नाहीत. फक्त मतदाना पुरते प्रत्येक पक्षाने येथील जनतेचा वापर करून घेतला आहे. या पुढे असे होऊ नये अशी मागणी या ठिकाण चे नागरिक करत आहेत.


Post a Comment

0 Comments