Latest News

6/recent/ticker-posts

आज पहाटे भाद्यात पावसाचे पुन्हा ' दे दणादण !!  सोयाबीन उत्पादक शेतक-याची चिंता वाढली !

आज पहाटे भाद्यात पावसाचे पुन्हा ' दे दणादण !! 


सोयाबीन उत्पादक शेतक-याची चिंता वाढली !



{बाबुराव आगलावे}


भादा: आज पहाटे ( शनिवार) भादा व परिसरात पावसाने मनसोक्त बॅटींग केली काही वेळासाठी लगातार असा बरसत होता जणू हर बाॅल पे ' दिलसे ' बाॅन्ङ्री के बहार!! जणू ' सिक्सर ! 


       तसेतर भादा व परिसरात गेल्या चार पाच दिवसा पासुन अधुन मधुन उत्तरा नक्षत्राच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली त्यापूर्वी या भागातील अनेक ठिकाणचे सोयाबीन पावसा अभावी करपले होते. सुरूवातीला हा पाऊस बरा वाटला पण बघता बघता तो अनेक ठिकाणी असा पङत गेला कि अनेक ठिकाणी चिबङ रानातील सोयाबीन पाण्यात उभे राहीले एवढेच नाही तर अशा ठिकाणी उभ्या झाङालाच कोंब फुटत आहेत. अशातच आज पहाटे या परिरात पहाटेच पावसाने साखर झोपेतच मै आ रहा हुॅ म्हणत काही काळासाठी चांगलीच हजेरी लावली अस्सं वाटत होते जणु हर बाॅल पे सिक्सर ! यामुळे आज सकाळी हि शिवारात अनेकांच्या सोयाबीन पिकातुन पाणी वाहत आहे. यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत.


Post a Comment

0 Comments