Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तहसीलदारानी केली सावनगीरची पाहणी

निलंगा तहसीलदारानी केली सावनगीरची पाहणी



केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील सावनगीरा शिवारातील सोयाबीन पाण्याखाली गेले असल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाला आर्थिक फटका बसला आहे.


त्याची दखल घेऊन काल शुक्रवारी औराद शाहजानी येथून नुसकाणीची पाहणी केल्यानंतर सावनगीरा येथील पाण्याखाली गेलेल्या सोयाबीनची पाहणी तहसीलदार गणेश जाधव यांनी केली आहे.


मात्र निलंगा तालुक्यातील केळगाव ,लांबोटा,खडकउमरगा,बुजरूकवाडी, माचरटवाडी,कलांडी या गावात पण परतीच्या पावासाने हजारो एकर पिकाचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे .उभ्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्याला बसला आहे विशेष केळगावमध्ये सोयाबीनची नासाडी झाली आहे.त्याचा विसर तहसीलदाराना पडला काय ? असे शेतकरीवर्ग म्हणत आहे.लवकरात लवकर या सर्व गावचे पंचनामे करून नुसकांन भरपाई द्यावी ही मागणी शेतकरी बालाजी पाटील,मोसींन पांढरे,मतीन पटेल,दत्ता काळे,ताहेर पटेल,गोविंद काळे,तुराब मुजावर सह अनेक शेतकऱ्यांनी जोर धरला आहे.


Post a Comment

0 Comments