औसा तालुक्यातील दापेगाव च्या सुपुत्राने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले एका महिलेचे प्राण
औसा:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि १९ - गजेंद्र सोनटक्के शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी असताना एक महिला उपवन तलावामध्ये आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली असता त्या महिलेचे प्राण क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेऊन वाचविले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ठाणे येथील पोलीस कर्मचारी गजेंद्र सोनटक्के व त्याचे साथीदार मोरे साहेब ड्युटीवर असताना एक महिला धावत त्यांच्याकडे आली व त्यांनी सांगितले की माझ्या सोबत असलेली एक महिला आत्महत्या करण्याच्या विचाराने तलावात उडी घेतली आहे. त्यावेळेला गजेंद्र सोनटक्के यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या तलावात उडी घेतली. त्यावेळेला जीवाच्या आकांताने ती महिला सोनटक्के यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना तेही पाण्यामध्ये बुडू लागले .मात्र खंबीरपणे त्या महिलेला कसेबसे तलावाच्या कडेला आणले व त्या महिलेची जीव वाचविले.या कार्यामुळे गजेंद्र सोनटक्के यांचे कौतुक पोलिस ठाण्यांतर्गत सर्वजण करत आहेतच तसेच त्यांचे मूळ गाव दापेगाव याठिकाणीही त्यांचे कौतुक केले जात आहे.
0 Comments