हडपसर पोलीसांनी एकुण ६ आरोपीतांना अटक करुन त्यांचेकडुन तब्बल १८ गावठी बनावटीचे पिस्तुल व २७ जिवंत काडतुसे केले हस्तगत
पुणे:(प्रतिनिधी/अमर ईभाते) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या सुचनानुसार हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने व तपास पथकातील पो.हवा.प्रताप गायकवाड, पो. ना. नितीन मुंढे, पो. ना. विनोद शिवले, पो. शि. अकबर शेख, पो. शि. शाहिद शेख, पो. शि. शंशीकांत नाळे, पो. शि. प्रशांत टोणपे, हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक कार्यालयात हजर असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पाच ते सहा इसम हे कानिफनाथ वस्ती, फुरसुंगी पुणे येथे असलेल्या मोकळ्या जागेत एका मोटार सायकलीच्या जवळ थांबलेले असुन त्या प्रत्येक इसमांच्या कमरेला पिस्तुल आहे. सदर बातमीचे अनुशंगाने लागलीच सदर ठिकाणी हडपसर पोलीस तपासपथकातील अधिकारी व त्याचे सोबतचे स्टाफने सापळा लावुन इसम नामे १) अरबाज रशिद खान, वय २१ वर्षे, रा. शिरुर, गंगा फेज २ बिल्डींग, फ्लॅट नं.३०१, ता. शिरुर जि. पुणे, २) सुरज रमेश चिंचणे ऊर्फ गुळया, वय २२ वर्षे, रा. स.नं. २१५, गंगानगर, वरद विनायक कॉलनी, फुरसुंगी, पुणे, ३) कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश, वय १९ वर्षे, रा. शिरुर, बुरुड आळी, ता. शिरुर जि. पुणे .४) जयेश राजु गायकवाड ऊर्फ जय, वय २३ वर्षे, रा. शिरुर, लाटे आळी, ता. शिरुर जि. पुणे, ५) विकास भगत तौर ऊर्फ महाराज, वय २८ वर्षे, रा. स.नं. १२. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे, ६) शरद बन्सी मल्लाव वय २१ वर्षे रा.मु. पो. काचेआळी, ता. शिरुर जि. पुणे. यांना पकडून त्यांचेकडे तपास केला असता त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्तुले, जिवंत काडतुसे असे विनापरवाना, बेकायदेशीर व अनाधिकाराने अग्निशस्त्रे विक्री करण्याकरीता जवळ बाळगले असताना मोटार सायकलसह मिळून आल्याने वरील नमूद आरोपी यांचेविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १४३ ९/ २०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३,७,८ (२५), महा. पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) (३) सह १३५ व
भादविक ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला व त्यामध्ये नमूद आरोपीतांना दाखल गुन्हयात दिनांक २०/ ० ९/ २०२० रोजी २२/५० वाजता अटक करण्यात आले आहे. अटक आरोपीत यांचे ताब्यातुन एकुण १८ गावठी बनावटीचे पिस्तुले, २७ जिवंत काडतुसे, एक चोरीची एफ झेड मोटार सायकल मिळुन एकुण ५,६८,१००/-रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन हडपसर पोलीसांची पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आजवरची सर्वात मोठी कामगिरी केली आहे. नमुद आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्तुले व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडण्यास आळा बसलेला आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामिण परिसरात पिस्तुल तस्करीचे, तसेच मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपी अरबाज रशिद खान हा मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण यांचे गुन्हयात पाहीजे आरोपी आहे. तरी त्याचे मध्यप्रदेश राज्याचे पिस्तुल तस्करीच्या साखळी बाबत अधिक तपास चालु आहे. सदरची कामगिरी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखाली नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांचे सुचनानुसार कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहा. पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, सहा पोलीस फौजदार युसुफ पठाण, पो.हवा.राजेश नवले, पो.हवा.प्रताप गायकवाड, पो.ना. सैदोबा भोजराव, पो.नां. विनोद शिवले, पोना. नितीन मुंढे, पो.शि. अकबर शेख, पो.शि शशिकांत नाळे, पो.शि.शाहीद शेख, पो.शि.प्रशांत टोणपे, पो. नागोविंद चिवळे, व पो.शि.अमित कांबळे, पो.ना.प्रविण उत्तेकर, पो. शि. नरसाळे यांनी केली आहे. सदरच्या कामगिरी बाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहर यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments