Latest News

6/recent/ticker-posts

बेलकुंड व किल्लारीचा साखर कारखाना सुरू करावा आमदार अभिमन्यु पवार यांची उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

बेलकुंड व किल्लारीचा साखर कारखाना सुरू करावा आमदार अभिमन्यु पवार यांची उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी



औसा:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२२ - श्री संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना, बेलकुंड व शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी हे दोन्ही कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहेे. मागच्या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असल्याने माझ्या औसा मतदरसंघातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असून मतदरसंघात ५ लक्ष मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस सध्या तयार आहे. औसा मतदरसंघासह परिसरातील ऊसाचे वेळेत गाळप होण्यासाठी श्री संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना, बेलकुंड व शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी हे कारखाने सुरू होणे अत्यावश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करून दोन्ही कारखाने सुरू करण्यात यावेत अशी विनंती केली आहे. दोघांसोबतही अतिशय सकारात्मक चर्चा झाली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर होईल असा विश्वास आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी सोबत सुभाष जाधव, संतोष मुक्ता, जि. प. सदस्य महेश पाटील, मारुती महाराज कारखान्याचे संस्थापक संचालक मधुकरअण्णा भोसले, दत्ता पाटील किनिकर, विद्यमान संचालक सुरेश पवार, पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, बागायतदार सभासद बालाजी शिंदे व लाडखॉ सय्यद उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments