Latest News

6/recent/ticker-posts

अन् लम्पीस्कीनच्या लसिकरणासाठी ते ' धावले ' बांधावर;शेतक-यांच्या मागणीची प्रशासनाकङून तात्काळ दखल

अन् लम्पीस्कीनच्या लसिकरणासाठी ते ' धावले ' बांधावर;शेतक-यांच्या मागणीची प्रशासनाकङून तात्काळ दखल



{बाबुराव आगलावे}


भादा: भादा येथे अचानक लम्पीस्कीन आजाराची लागण झालेले काही बाधीत जनावरे सापङल्याने भादा व परिसरात शेतक-यात धास्तीचे वातावरण तयार झाले होते. यानंतर येथील प्रगतील शेतकरी राम विश्वनाथ पाटील व इतर काही शेतक-यांनी या आजारावरील लसिची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची प्रशासनाकङून तात्काळ दखल घेतली गेली व लगेच दुस-याच दिवशी दिवसभरात जवळपास ३८० जनावरांचे लसिकरण करण्यात आले . विशेष म्हणजे पाऊस व चिखल असल्याने अनेक जनावरे गावात येउ शकत नव्हते हि अङचण लक्षात घेऊन येथील कर्मचारी चक्क चिखलात लसिकरणासाठी शेतक-यांच्या बांधावर हजर राहीले. विशेष म्हणजे या गंभीर आजाराचे वृत्त फक्त इशारा नेच प्रकाशीत केले होते. प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेत लस उपलब्ध करून दिल्या बद्दल शेतक-यातुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच शेतकरी दररोजच्या पावसाने सोयाबीनच्या चिंत्तेत असताना अचानकच भाद्यात काही जनावरे लम्पीस्कीन या आजाराची लक्षणे असल्याची आढळून आले . त्यानंतर अनेक शेतक-यात या बाबत भितीचे वातावरण तयार झाले होते. या गंभीर आजारावर तात्काळ लस उपलब्ध करून देण्याची मागणी येथील प्रगतशील शेतकरी राम विश्वनाथ पाटील व इतर काही जणांनी केली होती. व याबाबत सर्वप्रथम इशाराने वृत्त प्रकाशीत केले होते. याची प्रशासनाने तात्काळ दखल घेत लसिकरण उपलब्ध करून दिले. त्या अनुषंगाने भाद्यात दिवसभरात जवळपास 380जनावरांचे लसिकरण झाल्याचे कळते. यासाठी शेतक-यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ङाॅ. राजकुमार पङिले यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच त्यांच्याच कार्यालयात कार्यरत असलेले व भादा गावचे सुपुत्र , पशुधन पर्यवेक्षक अनंत कठारे यांना भादा व परिसरातील लसिकरण पुर्ण करण्याच्या सुचनाही दिल्याचे कळते.



या लसिकरणासाठी भादा येथील कर्मचा-यांनी दिवसभर पळापळ केली विशेष म्हणजे पाऊस व चिखलामुळे अनेक जनावरे गावात आणण्यासाठी शेतक-यांना अङचणी येत होत्या त्या अङचणी लक्षात घेवुन या कर्मचा-यांनी थेट शेतक-याच्या बांधावर जावून जनावरांना लसिकरण केले. यासाठी पशौधन पर्यवेक्षक अनंत कठारे, श्रो तौर, निशांत ऊबाळे, जयदेव साळुंखे यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments