निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांचे सहा महिन्यांपासूनचे वेतन रखडले
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यापासून वेतन दिले नाही हे कंत्राटी सफाई कामगार कोरोना ( कोवििड१९-) सारख्या महाभयंकर रोग असताना सुद्धा आपल्या जीवाची व कुटूंबाची पर्वा न करता काम करत आहेत तरी सुद्धा सहा महिने झाले असताना त्या सफाई कामगारांना वेतन दिले नाही आम्ही कसे जगावे काय खावे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे असा सवाल कंत्राटी सफाई कामगार करत आहेत आमचे वेतन नाही मिळाले तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, उपविभागीय अधिकारी निलंगा, तहसीलदार, तहसील कार्यालय निलंगा, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, पोलीस निरीक्षक, निलंगा याच्या मार्फत कंत्राटी सफाई कामगारांनी दिलेल्या निवेदनातुन केला आहे या निवेदनावर जयश्री कांबळे, परमेश्वर हाणमंते, पद्मिन उकळे, सारिका कांबळे, कमलाबाई हाणमंते, गंगुबाई गायकवाड, असिफ शेख, अलका कांबळे, अभंग मूळे, अजय कांबळे, आदी महिला कामगारांच्या सह्या आहेत.
0 Comments