Latest News

6/recent/ticker-posts

माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य सेवा आपल्या दारी कोवीड आजाराला हरविण्यासाठी घ्या खबरदारी

माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य सेवा आपल्या दारी कोवीड आजाराला हरविण्यासाठी घ्या खबरदारी



चाकुर:(तालुका प्र./सलीमभाई तांबोळी) कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जगभरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून आपल्या आरोग्याविषयी काळजी घेणे तसेच जनजागृती करणे याच उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेचे उदघाटन नळेगाव व चापोली येथे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदासजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती सज्जनकुमार लोणाळे पं.स.सदस्य महेश वत्ते, तालुका वैद्यकिय अधिकारी अर्चना पंडगे मॕडम, गटविकास अधिकारी गोस्वामी साहेब, गोकणवार साहेब हे उपस्थित होते.तसेच नळेगाव येथे जि.प.सदस्या धनश्री अर्जुने,प.स.सदस्या उमादेवी राजमाने, नळेगावच्या सरपंच भालेकर मॕडम, राजेश अर्जुने, वैघकिय अधिकारी डॉ. राजकुमार टकटावळे, आशा कार्यकर्त्यां तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तर चापोली येथे निलेश मद्रेवार, महेश कांबळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सावंत, रमेश पाटील यांच्यासह आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते.


     या कोवीड काळात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आपल्या दारी येवून आपली सर्व माहीती मोबाईल ॲप द्वारे कुटुंबाची संपूर्ण माहीती भरणार आहेत. आपली स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. तसेच आपली तब्येत सांभाळून आरोग्याविषयी जर काही तक्रार असल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम आपण सर्वांनी यशस्वी करावयाची आहे. या साठी जनजागृती करणे आवश्यक असून आपली स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाची जबाबदारी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे असे समाजकल्याण सभापती रोहिदासजी वाघमारे पं. स. उपसभापती सज्जनकूमार लोणाळे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments