Latest News

6/recent/ticker-posts

भिवंडी दुर्घटनेत लातूर जिल्ह्यातील हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश

भिवंडी दुर्घटनेत लातूर जिल्ह्यातील हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश



उदगीर:(प्रतिनिधी) भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत उदगीर तालुक्यातील हाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे हाळी गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी पर्यंत सहा पैकी चार जणांचे मृतदेह मिळाल्याचे कुटूंबियांनी सांगीतले. हाळी येथील शेख कुटूंबातील आरीफ युसूफ शेख हा तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे आठ वर्षांपूर्वी पत्नी व तीन मुलांस गेला होता. तो खाजगी गाडीवर चालक म्हणून कामाला लागला. त्याचा संसार आनंदात सुरू होता. गावी असलेल्या भावालाही त्याने महिनाभरापूर्वी कामासाठी भिवंडीला बोलावून घेतले. राहण्यासाठी तो भिवंडी येथील जिलानी इमारतीत रहायला होता. मात्र नियतीला ते मान्य झाले नाही. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. त्यात इतर कुटूंबासह जिलानीचे कुटूंब गाडले गेले. त्यात कुटूंबप्रमुख आरीफ युसूफ शेख ३२ वर्षे, नसीमा आरीफ शेख २७ वर्षे, निदा आरीफ शेख १० वर्षे, सादिया आरीफ शेख ७ वर्षे, हसनैन आरीफ शेख ३ वर्षे, सोहेल युसूफ शेख २२ वर्षे यांचा त्यात समावेश आहे.


Post a Comment

0 Comments