केंद्र शासनाने कृषी सुधारणा कायदा २०२० मागे घ्यावा - जमात-ए-इस्लामी हिंद उदगीरच्या वतीने उपिल्हाधिकार्यांना निवेदन
उदगीर:(प्रतिनिधी) दि. - ३० जमात-ए-इस्लामी हिंद, संभाजी ब्रिगेड व शेतकरी यांच्या वतीने केंद्र शासनाने पारित केलेला कृषी कायदा २०२० शेतकऱ्याच्या विरोधात आहे. यात शेतकऱ्यांशी व विरोधी पक्षांशी कुठलीही चर्चा न केल्याने एकतर्फी हा कायदा सरकारने पारित केला. या कायद्यामुळे शेतकऱ्या बरोबरच सामान्य जनतेचे ह्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून कार्पोरेट वर्गाला यात संधी मिळणार आहे. कार्पोरेट वर्गाचा इतिहास आहे किती स्वतःचाच विकास करतात. म्हणून तो कायदा मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खतांचा पुरवठा सरकारने करावा. कापसाचे हमीभाव लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा सरकारने करावा अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.या प्रसंगी जमात ए इस्लामी हिंद, उदगीरचे शहराध्यक्ष मोमीन मुजीब, जिल्हाध्यक्ष हाशमी मिसबाहुद्दीन,सचिव दायमी रहीम, डॉक्टर शेख असगर, संभाजी ब्रिगेडचे राजकुमार अतनुरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कुणाल बागबंदे, शिवराज पाटील, जगिरदार मेहमूद अली, पटेल शफी सही अनेक शेतकरी बांधव व इतर पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments