जि.प.प्रा.शाळा देवणी(खु.),श्री योगेश्वरीदेवी माध्यमिक विद्यालय देवणी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) श्री योगेश्वरीदेवी मा.वि.देवणी येथे यशवंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शशिकांत गरड या विद्यार्थ्याचा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व शिक्षण विभाग जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल शाळेत श्री यशवंतराव पाटील यांच्या हस्ते त्याचे अभिनंदन केले त्यावेळी शाळेतील शिक्षक घोणसे आनंद, कस्तुरे रवी, गरड शंकर व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.
जि.प.प्रा.शाळा देवणी(खु.)शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्य ध्वजारोहण
देवणी खु.ता,देवणी येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहण शाळेचे मुख्यध्यापक कांबळे के.एन. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळाचे शालेय समितीचे अध्यक्ष यादुल पठाण, रणदिवे लक्ष्मण, ग्रा.प.सदस्य सजय गरड, व्यंकट गरड, नरवटे के.एन व अंगणवाडीतील कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, आयोध्या सूर्यवंशी,पुंड बि.वाय, बिरादार एस.पी. चांडेश्वरे एस.डी. तेजेवाड डी छान मुराळे व पालक शालेय समितीचे सदस्य उपस्थित होते.
0 Comments