Latest News

6/recent/ticker-posts

रोजच पावसाची बोंबाबोंब ! अहो सोयाबीनच्या शेंगालाच फुटतय कोंब !!           

रोजच पावसाची बोंबाबोंब ! अहो सोयाबीनच्या शेंगालाच फुटतय कोंब !! 



{के.वाय.पटवेकर}


निटुर: गेल्या दोन चार दिवसा पासुन अधुन मधुन सतत पङणारा पाऊस आणी आद्र हवामानाचा परिणाम सोयाबीन पिकावर होत असुन निलंगा तालुक्यातील निटुर व परिसरात सोयाबीनच्या झाङालाच शेंगाला कोंबं फुटत असल्याने सोयाबीन उत्पादनात फटका बसण्याची चिन्हे आहेत. अगोदर मुग उत्सापादक शेतक-यांना कुर्बा नक्षत्रातल्या पावसाने दणका दिला होता त्यामुळे अनेक मुग उत्पादक शेतक-च्या शेतात झाङांनाच ' करे ' आले होते. त्यामुळे त्यांचीही निराशाच झाली होती. आत्ता मात्र सारी भिस्त सोयाबीनवर असताना गेल्या दोन चार दिवसा पासुन वातावरणात नुसता गारवा असुन अधुन मधुन सतत पावसाचा शिङकावा आहे त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम सोयाबीनच्या पिकावर होत असुन निलंगा तालुक्यातील निटुर व परिसरात सोयाबीनच्या झाङाला शेंगालाच कोंब फुटत असल्याची माहीती निटुर येथील शेतकरी सत्तार इक्बाल गस्ते यांनी इशाराला दिली. अशा परिस्थिती मुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार असुन उत्पादनात घट येणार असल्याची भिती शेतकरी बोलुन दाखवत आहेत. अगोदर कुर्बा च्या पावसाने मुगाची ' दाळ ' अनेकांच्या शेतातच केली तर आत्ता ' उत्तरा' चा पाऊस सोयाबीनला ' झाङालाचच ' कोंब ' फोङत असल्याने निसर्गाच्या या चक्रात शेतक-याचच ' खळं' होण्याची वेळ येणार कि काय याचीच भिती वाटत आहे.


Post a Comment

0 Comments