Latest News

6/recent/ticker-posts

खरोसा येथील युवकाने केला विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’च्या शेतीचा यशस्वी अनोखा प्रयोग

खरोसा येथील युवकाने केला विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’च्या शेतीचा यशस्वी अनोखा प्रयोग



खरोसा:{प्रतिनिधी/श्रीकांत डोके} थायलंडमध्ये पिकवले जाणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ हे पिक आता औसा तालुक्यातील खरोसा येथील अजित सुरवसे या युवकाने फुलवले आहे.यामध्ये त्याचा मोठा भाऊ गोविंद सुरवसे यांचे मोठे योगदान आहे.एकेकाळी पारंपरिक शेती करणारे सुरवसे कुटुंब आज सर्व शेतकरी बांधवासाठी आदर्श ठरत आहेत.


प्रथम गोविंद यांनी संगणाकाच्या साह्याने कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारया या पिकाची सविस्तार माहिती एकञित करत कसलाही अनुभव नसताना या पिकांची लागवङ करण्याचा यशस्वी निर्णय घेतला.शेतीत कसल्याही प्रकारचा पाण्याचा स्ञोत नसल्यामुळे सुरवसे यांनी वङिलोपार्जित कोरङवाहु सहा एकर शेतीत प्रथम बोरवेल्स घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करत ठीबक चा वापर करत दोन एकर क्षेञावर त्यांनी सुमारे दोन हजार रोपांची लागवङ केली आहे. 


हे पिक तब्बल २० वर्षे प्रत्येक हंगामात एक झाड शंभरपेक्षा जास्त फळांचे उत्पन्न देते.आज घङीला या फळाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागनी आहे.या फळाला 200 ते 250 रुपये प्रति किलो चा बाजारभाव असुन शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट हे फळपीक ‘ आर्थिक वरदान’ देणारे ठरत आहे. हे फळ रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व अन्य रोगावंर वरदान ठरत असल्यामुळे,याला बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे.सुरवसे यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल अनेक स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments