Latest News

6/recent/ticker-posts

माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवास प्रारंभ 

माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवास प्रारंभ 



339 वां जन्मोत्सव सोहळा;धार्मिक पाठ, कथा व कीर्तन


नांदेड:{ जि.प्र./पिराजी गाडेकर} दि. 26 - शहराजवळच असलेल्या मुगट परिसरातील ऐतहासिक गुरुद्वारा, माता साहेबदेवाजी येथे दि. 26 ऑक्टोबर रोजी माता साहेबदेवा जी यांच्या 339 व्या जन्मोत्सवास सुरुवात झाली. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे. 


पवित्र पावन अशा जन्मोत्सव सोहळ्याचे उद्धघाटन आज सकाळी 9 वाजता दरम्यान गुरुद्वारा तखत सचखंड साहेबचे मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार संतबाबा तेजसिंघजी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिति होती. 


गुरुद्वारा माता साहेबचे माजी जत्थेदार व शिरोमणि पंथ अकाली बूढा दल 96 करोडी संतबाबा प्रेमसिंघजी सचखंडवासी यांच्या द्वारे स्थापित परंपरेनुसार आणि प्ररेणानुसार या जन्मोत्सवास समर्पित श्री अखण्डपाठ साहबाचे प्रारंभ आज करण्यात आले. भक्तिभावाने पाठ पठन करण्यात आले. वरील पाठाचे समारोप दि. 28 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. आज सकाळी धार्मिक दीवान कार्यक्रमास सुरुवात झाली. भाई जगतेश्वर सिंघजी पटिआला वाले रागी जत्था यांचे कीर्तन झाले. पश्च्यात भाई जीवनसिंघजी व भाई सुखदेवसिंघजी लुधियानावाले रागी जत्था यांनी शब्दकीर्तन सादर केले. या जन्मोत्सव सोहळ्यास सुप्रसिद्ध रागी, कथाकार, कीर्तनकार आणि धार्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंची उपस्थिति राहणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता पाळण्यात येत आहे. माता साहेब परिसरात वैद्यकीय पथकाची नियुक्ति करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बाबा तेजसिंघजी यांनी सर्वांना आवाहन केले आहे. या निमित्त भाविकांसाठी लंगर प्रसाद, चहा व ब्रेड पकोड़े लंगर सुरु करण्यात आले आहे. बाबा लालसिंघजी आणि गुरुद्वारा लंगर साहेबचे सेवादार लंगर सेवेत सहभागी झाले आहेत. मुदखेड पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनात भव्य पोलिस बंदोबस्त मातासाहेब परिसरात तैनात करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments