Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा ओलादुष्काळ जाहीर करावा-आभिमन्यु पवार

लातूर जिल्हा ओलादुष्काळ जाहीर करावा-आभिमन्यु पवार



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१५ - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी फोनवर चर्चा करून अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देऊन औसा मतदारसंघाची चाॅपर द्वारे हवाई पाहणी करण्याची व ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे.अजितदादांनी ओल्या दुष्काळाची मागणी रास्त असल्याचे म्हणून हवाई पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. लातूर जिल्ह्यात मागच्या २ दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. दुबार पेरणी, पावसाने उघाड दिल्यामुळे बी न भरणे, त्यात पुन्हा करपा रोग पडून नुकसान, काढणीपूर्व झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी बी कुजले तर काही ठिकाणी उभ्या पीकावर कोंब फुटले अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना या वर्षी करावा लागला. या सगळ्यातून जे काही वाचलेले त्या सोयाबीनच्या बनमी २ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्या आहेत किंवा बनीम भिजून उरलेसुरले सोयाबीन खराब झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही आपात्कालीन परिस्थिती आहे. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देऊन मतदारसंघातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. औसा मतदारसंघाची चाॅपर द्वारे हवाई पाहणी करण्याची तसेच लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची व शेतकऱ्यांना वीज बिल माफी, पीककर्ज माफी देण्यात यावी अशी विनंती यावेळी केली. "ओल्या दुष्काळाची माझी मागणी रास्त असल्याचे मत व्यक्त करून आदरणीय दादांनी हवामान खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर हवाई पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे." तसेच काल रात्री ११ वाजता राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे प्रधान सचिव यांच्याशीही फोनवर चर्चा करून त्यांनाही अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात उद्भवलेली परिस्थिती कळविली आहे. संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी बांधव प्रचंड अडचणीत असून त्यांना शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीची आणि मानसिक आधाराची गरज आहे. सरकार लवकरच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments