Latest News

6/recent/ticker-posts

लाच प्रकरणी चाकुरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल

लाच प्रकरणी चाकुरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल



चाकुर पोलीस ठाण्यात कलम 7 लाप्रका प्रमाणे गुन्हा दाखल


चाकुर:(ता.प्रःसलीमभाई तांबोळी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाकुर सहाय्यक पोलीस निरीक्षक विरोधात चाकुरात गुन्हा दाखल चाकुर पोलीस ठाण्यात कलम 7 लाप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हाचा तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग लातुरचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे करीत आहेत. तक्रार अर्जावर दाखल असलेल्या गुन्हात आरोपीवर कारवाई करण्यासाठी चाकुर पोलीस ठाण्याच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी 50 हजार रुपये मागणी केल्याचे उघड झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी दिली.चाकुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात आरोपीवर कारवाई करण्याच्या कामासाठी चाकुर पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मारोती तोटेवाड यांनी तक्रारदाराकडे 1 लाखाच्या लाचेची मागणी केली.तडजोडीअंती 50 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.माञ संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी रक्कम घेण्याचे टाळले. याबाबत चाकुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.


Post a Comment

0 Comments