Latest News

6/recent/ticker-posts

वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त नागनाथ पाटील यांचा सन्मान  

वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त नागनाथ पाटील यांचा सन्मान  



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) घरोघरी वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान म्हणून आज दि. १५ आॅक्टोंबर रोजी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त दै. सकाळच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या जागतिक साथीमुळे अवघा समाज संकटात आहे. अशा परिस्थितीतही वृत्तपत्र विक्रेत्यांनी अविरत सेवा दिली आहे. सकाळ माध्यम समुहाने राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. भारताच्या दक्षिण टोकावरील छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत. वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज पन्नास वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते, असा उल्लेख डॉ. कलाम यांनी "विंग्ज ऑफ फायर' या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. याच पध्दतीने चाकूर शहरात मागील ४६ वर्षापासून अविरतपणे कार्य नागनाथ पाटील यांच्याकडून केले जात आहे. तिसरी पिढी त्यांच्याकडून वर्तमानपत्र घेत आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो अथवा कोणतीही कौटुंबीक अडचण आली तरी घराघरात वर्तमानपत्र पाहचविण्याचे अविरीत कार्य त्यांच्याकडून होत असल्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान दै. सकाळ परीवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी सकाळचे तालुका बातमीदार प्रशांत शेटे, संपादक संग्राम वाघमारे.


Post a Comment

0 Comments