आझाद महाविद्यालयात डॉ. कलाम जयंती साजरी
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१५ - औसा येथील आझाद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ई.यु.मासूमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मजहर कोतवाल होते. प्रमुड पाहुणे म्हणून बोलताना प्रा. मजहर कोतवाल यानी डाॅ.कलाम यांचा स॔पूर्ण जीवनपट व त्यांच्या रामेश्वरपुरम या खेड्यातून गुरूप्रेमी-मातापिताभक्त विद्यार्थी, एक श्रेष्ठ देशभक्त वैज्ञानिक ते दिल्ली येथील राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास याचा दैदिप्यमान इतिहास अत्यंत मुद्देसुद व रसाळ वाणीने प्रभावी भाषाशैलीत उलगडून दाखवा. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डाॅ. मासूमदार यांनी डाॅ. कलामांचे मुल्य व स॔स्कारनिष्ठ जगणे, त्यांची निस्पृह, निस्वार्थ देशसेवा आणि त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना-प्रसंगाचे दाखले देत काही अविस्मरणीय आठवणी सांगत या महाप्पुरूषाचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल केली तरच त्यांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. चव्हाण यांनी तर आभार-प्रदर्शन सहकार्यक्रमाधिकारी प्रा. टिंगरे यानी केले. कार्यक्रमाला सामाजिक अंतर ठेवून वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक हजर होते.
0 Comments