Latest News

6/recent/ticker-posts

बळीराजाला सरसकट एकरी ५०,००० तर बागायतीला १ लाख नुकसान भरपाई देण्यात यावी - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

बळीराजाला सरसकट एकरी ५०,००० तर बागायतीला १ लाख नुकसान भरपाई देण्यात यावी - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख)निलंगा मतदार संघातील संपूर्ण मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. निलंगा तालुक्यातील औराद शा., माने जवळगा, सावरी, तगरखेडा, वांजरखेडा, गुंजरगा, माकणी, हलगरा, हालसी या भागातील शेताची प्रत्यक्ष बांधावर जाऊन माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. त्याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे,संजय दोरवे, रज्जाक रकसाळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आ.पाटील बोलत होते आता सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. 


Post a Comment

0 Comments