औशातील तिसरा टप्पा कामाचा मार्ग मोकळा आ.पवार यांचा पाठपुरावा, पालिकेने गतिमान होणे आवश्यक
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख) औसा शहरातील विकास कामातील महत्त्वाच्या व तिसऱ्या टप्प्यातील हनुमान मंदिर ते जामा मस्जिद या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीनेे रस्ता भुसंपादन व मोजणी प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती.दरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या पाठपुरव्यास अखेर यश आले असून या रस्त्याचे भुसंपादन करण्यासाठी मोजणीची प्रक्रिया सुरू झाली असून या टप्प्यातील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. बसस्थानक ते किल्ला मैदान याला जोडणारा औसा शहरातील मुख्य रस्ता असलेल्या या रस्ता कामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांची होती .वाढती वर्दळ व व्यावसायिक दुष्टीकोनातून या रस्त्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता.हा रस्ता खराब झाल्याने सर्व सामान्य नागरिक,व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण होत असल्याने या महत्त्वाच्या कामासाठी आ.अभिमन्यू पवार यांनी सातत्याने लातूरचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.शहरातील दोन टप्प्यांतील काम पुर्ण झाल्यानंतर हनुमान मंदिर ते जामा मस्जिद हा अंदाजे दोनशे ते अडीचशे मीटर लांबीच्या रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी या रस्त्याचे भुसंपादन करण्यासाठी मोजणीची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती.आता आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने हा मार्ग मोकळा झाला असून या रस्त्याचे भुसंपादन करण्यासाठी मोजणी प्रक्रिया संपल्यावर कामाचे अंदाजपत्रक करुन या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू होण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे.औसा नगरपालिकेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गतिमान होण्याची आवश्यकता आहे.
0 Comments