Latest News

6/recent/ticker-posts

दिव्यांगांनी केले औसा नगरपालिकेसाठी "भीक मांगो आंदोलन"

दिव्यांगांनी केले औसा नगरपालिकेसाठी "भीक मांगो आंदोलन"



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.५ - औसा नगरपालिकेकडून दिव्यांगासाठी पाच टक्के निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल नगरपालिकेची परिस्थिती हालाखीची आहे असे गृहीत धरून येथील दिव्यांगांनी आज ५ ऑक्टोंबर रोजी नगरपालिकेच्या फंडासाठी "भीक मांगो आंदोलन केले." हे आंदोलन नगरपालिकेच्या धोरणाविरोधात असल्यामुळे येथील दिव्यांगांनी चिडून हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात नगरपालिकेकडून पाच हजाराचा डेमो चेक देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात दिव्यांगाच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात आले होते. येथील दिव्यांगांनी मिळून पालिकेला निवेदन देऊन हे आंदोलन घडवून आणले आहे. या आंदोलनाला येथील सामाजिक कार्यकर्ते खुनमीर मुल्ला यांनी समर्थन दर्शवून "त्यांच्यासाठी जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत पालिकेला शांत बसू देणार नाही"असे म्हटले आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधाला असता त्यांनी असे सांगितले की "लाॅकडाऊनच्या काळामध्ये पालिकेची वसुली कमी झाल्यामुळे आम्ही दिव्यांगाचा निधी देऊ शकलो नाही. आता थोडी परिस्थिती आवाक्यात आली आहे.लवकरच त्यांचा निधी खात्यावर वर्ग करणार आहोत" अशी प्रतिक्रिया दिली. संपूर्ण महाराष्ट्र अशाप्रकारचे आंदोलन होणे म्हणजे पालिकेचे नाकर्तेपणाचे लक्षण दिसून येते. पालिकेने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी येथील दिव्यांगांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments