मयताच्या कुटुंबास आरविंद पाटलाची सांत्वन भेट सोबत शहिद कुटुंब यांनाही भेट
केळगाव:(प्रतिनिधी वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथे मागील काही दिवसात मयत झालेल्या कुटुंबास सांत्वन भेट आरविंद पाटील निलंगेकर यांनी आज दिली आहे.
मागील काही दिवसात मयत झालेल्या कुटुंबाला आज आरविंद पाटील यांनी सांत्वन भेट दिली आहे.
प्रथमता कोविड मुळे मृत्यू पावलेल्या राम विठोबा चिंचकुटे यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या समस्या जणून घेतले
त्यानंतर कमलबाई दादाराव चव्हाण या मयत कुटुंबास त्यानंतर विठोबा पंढरीनाथ मुंजाळे या मयताच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सांत्वन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व कोविड मूळ सावधान राहवे सोशियल डिस्टन्स पाळावा मास्क व सॅनिटायझर वापर करून आपली काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.त्याचबरोबर अनेक वर्षापुर्वी भारतीय सीमेवर कर्तव्य बजावताना केळगावचे सुपुत्र शाहिद अब्बास हुसेन मुजावर यांचा वर्षानुवर्षे विसर पडत चाललं आहे त्यामुळे या भारत मातेच्या सपुताची आठवण म्हणून गावाच्या मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार व्हावे व त्यावर त्यांचे नाव लिहावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी संभाजीवर पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचा योग्य पाठपुरावा करून लवकरात लवकर भारतीय सीमेवर रक्षण करत वीरमरण लाभलरल्या पुत्राची आठवण म्हणून नक्की लवकर प्रयत्न करू असे त्यांच्या घरी भेट देऊन शहीद पत्नी रुकसाना मुजावर व पुतणे जावेद मुजावर यांना माहिती दिली आहे.व भविष्यात तुमच्या कुटुंबावर काही अडचणी आल्यास मी तुमच्या कुटुंबासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते सुधाकर चव्हाण,धोंडीराम( भम्पू)चव्हाण,प्रशांत चव्हाण,प्रवीण चव्हाण,जिलानी देशमुख, कल्याणी मिटकरी, शत्रूघन काळे,लहू कांबळे,शिवराम काळे सह गावातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments