हाथरस येथील सामुहिक बलात्कारा करुण जिभ कापुन अमानुष हत्या करणाऱ्या ओरोपिस तात्काळ फाशी घ्यावी
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तहसिलदारांना निवेदन देऊन मागणी
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अखिल मानव जातीला काळामी फासणांरी घटना उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडली.उत्तरप्रदेशातील हाथरस येथील वाल्मीकी समाजातील तरुण मुलीवर ठाकुर जातीतील चौघाने सामुहिक बलात्कार करुण जिभ कापुन क्रुर हत्या करण्यात आली आहे.त्या पिडीत मुलीची भिभ कापली कारण की आरोपीचे नाव सांगु नये हा उद्देश होता.ही घटना देशातील मानव जातीतील लांचास्पद,मानवतेला काळीमा फासणारी भयंकर अमानुष क्रुर निंदनीय घटना घडली आहे.वेळेवर वैद्यकिय मदत मिळाली नसल्यामुळे त्या पिडीत मुलीचा मृत्यू झाला आहे.या घटनेला तेथील योगी सरकार व पोलीस प्रशासन जबाबदार आहे,त्याच बरोबर त्या मुलीचा प्रेत अंतिमसंस्कार करण्यासाठी तिच्या कुटुंबास सुपुर्द केला नाही.तसेच त्या पिडीत मुलीचा प्रेत रात्री अपराञी जाळण्यात आला आहे.त्या पिडित मुलीच्या प्रेताला खांदा देता आला नाही.ना उपस्थिती ना रितीरिवाजा प्रमाणे अखेरचा निरोप देता आला नाही.सर्वत्र आराजगाता झाली आहे.जनता ञस्त झाली आहे.सरकार मस्त बसले असुन प्रशासन सुस्त आहे.जर का त्या जनतेला भयमुक्त करायचे असेल न्याय व्यवस्था बळकट करायची असेल तर, त्या पिडीत मुलीच्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. उत्तरप्रदेशातील प्रशासान राञी बेराञी प्रेत जाळुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच तेथे बेटी जाळली नसुन मानुसकी जाळलेली आहे.संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ असल्या कारणाने त्या घटनेचा व सरकाराचा जाहीर निषेध करुन उत्तरप्रदेशातील मुख्यमंञ्यानी तात्काळ राजनामा देण्याची मागणीही करण्यात आली. निवेदनांवर विष्णू तिकटे,राजेश कांबळे,रघुनाथ बेडदे,समाधान जाधव,अंकुश बोमदरे,गणपत वाघत,माने संदीप, कांबळे धिरज,गणपत सोनकांबळे, गंगाराम वाघमारे, गणेश पेदाटे आदिच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments