Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी कुलदीप जाधव यांची निवड

लातूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी कुलदीप जाधव यांची निवड



निलंगा (शहर प्रतिनिधी/ इरफान शेख ) लातूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारीऱ्यांची आज निवड करण्यात आली त्यात लातूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निलंगा तालुक्यातील धानोरा गावचे कुलदीप जाधव यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल विद्यमान उपाध्यक्ष कुलदीप जाधव यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या राजकारणात काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व माजी कृषी सभापती बजरंग दादा जाधव यांचे मनःपूर्वक आभार मांडले. यावेळी उपस्थित युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,लातूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, दगडुजी सोळंके, निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बाळासाहेब शिंदे, तानाजी बिराजदार, अशोक वाडेकर, बाळासाहेब पाटील आदी जण उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments