Latest News

6/recent/ticker-posts

किसान विरोधी कायदे मागे घेण्यासाठी लातुरात जोरदार निदर्शने

किसान विरोधी कायदे मागे घेण्यासाठी लातुरात जोरदार निदर्शने



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.- २ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार यांच्या विरोधात जे कायदे निर्माण केले आहेत ते कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी लातूर जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित होते. श्रीशैल उटगे यांनी काही दिवसापूर्वी अशाप्रकारचे आंदोलन करण्याचे निश्चित केले होते .या आंदोलनाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या काळया कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच विपणन व्यवस्था असणार नाही.म्हणजे शेतकऱ्यांचे तसेच व्यापारी,अडते यांचे मोठे नुकसान आहे. असे काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी ग्रामीण भागातील हजारो शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments