Latest News

6/recent/ticker-posts

प्रसिद्ध अभिनेते, लेखक, नाट्य कलावंत विद्याधर नामपल्ले यांचा चाकुर येथे सत्कार

प्रसिद्ध अभिनेते, लेखक, नाट्य कलावंत विद्याधर नामपल्ले यांचा चाकुर येथे सत्कार



चाकुर:{ प्रतिनिधी} श्री नामपल्ले हे सध्या गाजत असलेली सोनी मराठी चैनल वरील एेतेहासिक मालिका "जिजामाता" मध्ये झाबरे पाटील हे महत्त्वाचे पात्र साकारत आहेत. त्यांनी यापूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी,गंध फुलांचा गेला सांगून,अस्मिता,या सारख्या अनेक मराठी हिंदी मालिकेत चित्रपटात उल्लेखनीय काम केले असून. 


मराठी नाट्य क्षेत्रात "अबीर गुलाल" या नाटकातील मुख्य पात्राच्या बहारदार अभिनयामुळे नाट्य प्रेमिंच्या मनात घर केले आहे गत वर्षी सदरील नाटकाचा शो अहमदपूर व लातूर येथील दगडोजिराव देशमुख सभाग्रहात पार पडला. लातूर येथील प्रयोगासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर व नादेड येथील विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटनासाठी होते. उद्घाटन करून 10 मिनिटे नाटक बघण्याची विनंती आयोजकांनी केली दोन अंकी असलेला नाटकात तब्बल दोन तास वीस मिनिटे दोन्ही I S अधिकाऱ्यांसह पूर्ण सभाग्रहातील प्रेक्षकांनी आपली खुर्ची सोडली नाही हे विशेष. शो संपताच स्वतः जिल्हाधिकारी जी श्रीकांत साहेबांनी स्वतः मंचावर जाऊन मुख्य भूमिका साकारलेल्या विद्याधर नामप्पले यांची गळाभेट घेतली व अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले व येणाऱ्या IPS चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट "IPS" चे कथा पट कथा व संवाद लेखन केले असून या मध्ये महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे त्यांना आपण लवकरच मोठ्या पडद्यावर बघणार आहोत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले विद्याधर नामपल्ले हे काही कामानिमित्त अहमदपूर ला आले असता त्यांनी येथील मित्र मंडळींच्या आग्रहास्तव चाकुरला धावती भेट दिली. या निमित्त त्यांचा छोटे खानी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील यशदाई वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी रामजी मोठराव, शामजी मोठेराव, महेश नाईकवाडे,गुणवंत मोठेराव आकाश गायकवाड, जितू मोठेराव, निखिल वाघमारे, शुभम मोठेराव, आदित्य भालेराव, राजेश अरगडे, आकाश गायकवाड आदी हजर होते.


Post a Comment

0 Comments