Latest News

6/recent/ticker-posts

शेख जाबीर व किरण यादव चौथी पदवी ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय रेफरी परीक्षा उत्तीर्ण

शेख जाबीर व किरण यादव चौथी पदवी ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय रेफरी परीक्षा उत्तीर्ण



नागपूर: ऑल इंडिया कोशिकी फेडरेशनच्या वतीने शेख जाबीर व किरण यादव चौथी पदवी ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय रेफरी परीक्षा उत्तीर्ण ऑल इंडिया कोशिकी फेडरेशन हॉलमध्ये ऑनलाईन ब्लॅक बेल्ट व रेफरी परीक्षेचे आयोजन केले होते. ज्यात महाराष्ट्र राज्यातील 4 ब्लॅक बेल्ट आणि 14 राष्ट्रीय रेफर सहभागी झाले होते. शेख जाबीर आणि किरण यादव यांना नागपूरमधून चौथा पदवी ब्लॅक बेल्ट आणि राष्ट्रीय पंच म्हणून सन्मानित करण्यात आले. शेख जाबीर आणि किरण यादव कोशिकी मार्शल आर्ट महाराष्ट्रातील ब्लॅक बेल्ट धारक दर्जाचे बनले आहेत. साहिल तापकारी अहमद हुसेन, सायली तोपकर, हरिओम कृपाल, राजेंद्र चौबे, काली मो दिन पटेल या सर्वांना फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट मिळाले. अमर लाले, कमलेश ठाकूर, अक्षय भिंगारे, कनिका शर्मा, साहिल तापकरी, महिंद्रराजे, नितीन कदम, श्रावण भोयर, धनश्री पांड्राम, हेमंत कुशवाह, आश्लेषा धुडबाडे गौरव वाघमारे, वैष्णवी वाटकर, मंदार सोनवणे यांचा राष्ट्रीय रेफरीमध्ये समावेश आहे. प्रत्येकाने आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख जबीर आणि सचिव किराव यादव आणि ताज मोहम्मद सय्यद फिरोज सर यांना दिले.


Post a Comment

0 Comments