Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य पदासाठी अर्ज करावेत

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य पदासाठी अर्ज करावेत



लातूर:(जिमाका) जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीवर कार्य करण्यात इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले अर्ज नेहरु युवा केंद्र कार्यालयास दिनांक 15 ऑक्टोबर 2020 सायंकाळी 04.00 पुर्वी करावेत असे जिल्हा युवा समन्वयक साक्षी समैया यांनी कळविले आहे. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत युवा केंद्र लातूर मार्फत ग्रामीण भागातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.गाव तिथे युवामंडळ व युवक मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन हा नेहरू युवा केंद्राचा मूळ उद्देश आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. जिल्हा स्तरावरील या समितीमध्ये विविध विभागाचे अधिकारी, एक स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी व दोन अशासकीय सदस्यांचा समावेश असतो. सदरील समिती पुर्नगठन प्रस्तावीत असुन लवकरच समितीची रितसर स्थापना करण्यात येईल. असेही नमुद केले आहे.


Post a Comment

0 Comments