Latest News

6/recent/ticker-posts

लंपी रोग नियंत्रणासाठी जिल्हयात किंवा जिल्हा बाहेर जनावरांची ने आण करण्यास मनाई

लंपी रोग नियंत्रणासाठी जिल्हयात किंवा जिल्हा बाहेर जनावरांची ने आण करण्यास मनाई



लातूर:(जिमाका) शासन अधिसूचनान्वये लातूर जिल्हा लंपी चर्मरोगासाठी नियंत्रीत क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. अधिसूचनेतीलनिर्देशानुसार लातूर जिल्हयात किंवा जिल्हयातून बाहेर गुरे व म्हशी ने आण करण्यासाठी मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी कळविले आहे. राज्यामध्ये लंपी स्किन डिसीज या रोगाचे गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यामध्ये नॅशनल इन्सिटटयूट ऑफ हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस, भोपाळ या संस्थेद्वारे रोगनिदान करण्यात आले. नुकतेच सांगली व सातारा जिल्हयामध्ये आढळून आलेल्या लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव इतर जिल्हयातील बाजारातून खरेदी करण्यात आलेल्या पशुधनामधूनझाल्याचे निदर्शनास आले आहे. या गो जातीय प्रजातीचे जीवंत किंवा मृत प्राणी, प्राण्याच्या संपर्कात आलेली वैरण, निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य, अशा प्राण्याचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा प्राण्यापासून अन्य कोणतेही उत्पादन नियंत्रण क्षेत्रामधुन बाहेर नेण्यास मनाई आहे. कोण्त्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणतेही अन्य काम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. लातूर जिल्हयामधील बाजारपेठेत, जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधीत प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे,असे ही प्रसध्दि पत्रकात नमूद केले आहे.


Post a Comment

0 Comments