मराठा सेवा संघाच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एम.एम.जाधव
लातूर:(प्रतिनिधी) मराठा सेवा संघ निलंगा चे तालुकाध्यक्ष शिवश्री एम. एम. जाधव यांनी आपल्या नोकरी सोबतच सामाजिक बांधिलकी जपत सेवा संघाचे कार्य अगदी तन-मन-धनाने, सेवा संघातील धडाडीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सेवा संघा अंतर्गत विविध कक्षाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन, जुने व नवे असा संघर्ष न होऊ देता सर्वांचा योग्य समन्वय साधून सेवा संघाचे कार्य, विविध कार्यक्रमा तून, जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेच्या माध्यमातून सेवा संघाची छाप निर्माण केली आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सहकारी यांनी ही त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या या कार्याची दखल वरिष्ठ नेतृत्वाने घेऊन त्यांची लातूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली आहे.या निवडी बद्दल प्रमोद कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष निलंगा, डॉ शेषराव शिंदे साहेब डॉ. उद्धव जाधव साहेब इर्शाद शेख, डॉ. लाला देशमुख,अॅड.तिरुपती शिंदे,साहेब ,बरमदे सर,माधव गाडीवान,गुणवंत गायकवाड, सुबोध गाडीवान, विनोद सोनवण,धनुरे अंकुशे, पेरमेश्वर बोधले यांनी शिव अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शिव शुभेच्छा दिल्या.
0 Comments