Latest News

6/recent/ticker-posts

आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुंबईत घेतली विविध मंत्र्यांची भेट

आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुंबईत घेतली विविध मंत्र्यांची भेट



चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात विविध मंत्री महोदयांची भेट घेऊन मतदार संघातल्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमहोदयांना अवगत केलं यामध्ये आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ययांच्याशी चर्चा करून अहमदपूर चाकूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे अर्धवट राहिलेले क्रमांक ट्रामा केअर कामासंदर्भात व कर्मचारी भरती संदर्भात निवेदन देऊन त्यावर प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांच्या प्रस्ताव सुद्धा देण्यात आला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिरूर ताजबंद येथे ग्रामविकास सचिवालय बांधकामास निधी प्राप्त करून देणे तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकाम आणि सीएससी केंद्रांना खोल्या बांधकाम मंजूर कराव्यात असे निवेदन देण्यात आले तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर, शिरूर ताजबंद चाकूर, नळेगाव, किनगाव राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या आवारात व्यापारी संकुल बांधण्यात संदर्भातला प्रस्ताव माननीय मंत्री महोदय यांना देण्यात आला.


Post a Comment

0 Comments