उपजिल्हा रुग्णालयातील सिद्धेश्वर मेंनकुदळे यांची स्त्री रुग्णालय अंबाजोगाई येते बदली
निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख} उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते कार्यरत असणारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सिद्धेश्वर विठ्ठलराव मेंनकुदळे यांची स्त्री रुग्णालय अंबाजोगाई येते बदली झाल्यामुळे आज शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात सिद्धेश्वर विठ्ठलराव मेंनकुदळे यांचा सत्कार निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सौंदळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय येते सिद्धेश्वर मेंनकुदळे 8 एप्रिल 2014 रोजी रुजू झाले होते. निलंग्यात गेल्या सहा वर्षांपासून मेंनकुदळे सर अविरत सेवा करत होते त्यांची बदली झाल्यामुळे त्यांचे अश्रू अनावर होत होते ते पाहून उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुद्धा अश्रू अनावर झाले. त्यांची बदली झाल्यामुळे सर्व जण भावुक झाले होते. एक मनमिळाऊ , मितभाषी , संयमी व्यक्तिमत्त्व व रुग्णालय म्हंटलावर अडचण कधी येईल ते सांगता येत नाही जेंव्हा ही फोन केले की सर उपस्थित राहत असत असे रुग्णालयात बोलले जात होते. यावेळी उपस्थित निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सौंदळे, डॉ.दिनकर पाटील, डॉ.अर्चना ढोबळे, डॉ.जयश्री माने, औषध निर्माण अधिकारी पांडुरंग नागमे, श्रीमती भाग्यश्री काळे, मंगल माने, सिंधु जाधव, मुल्ला यास्मिन , अंजुम सौदागर , सुरेखा माने ,निर्मला लिंबाळक, श्रीमती आळंदकर, संध्या लोढ़े, कल्याणी होनमुटे, रीना डूमलवाड, मायादेवी पवार , मीना उसनाळे , फरजाना शेख श्री.अलगुडे मदार , विजय चव्हाण, लक्ष्मण .फुलसुंदर, वाहेद शेख, दत्तात्रय मेत्रे, मनोज बरमदे, अजय कांबळे याप्रसंगी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments