Latest News

6/recent/ticker-posts

केळगावमध्ये रामरावजी महाराज याना श्रद्धांजली

केळगावमध्ये रामरावजी महाराज याना श्रद्धांजली



केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव (तांडा ) येथे संपूर्ण बंजारा समाजातर्फ़े 


बंजारा  समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी  येथील  संत श्री  सेवालाल महाराज यांच्या  वंशज मधील धर्मगुरू प.पु. अखंड ब्रह्मचारी  रामरावजी महाराज बापूंच्या निधनाने एका प्रदिर्घ कालखंडाला पूर्ण विराम मिळाला असून,बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली आहे.महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दु:खी व पोरका झाला होता तेवढाच आज झाला आहे 


त्यामुळे आज केळगाव तांडा येथिल बंजारा समाजातर्फ़े त्याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना आदरपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी त्यावेळी वसंत राठोड,शिवाजी राठोड,बालाजी आडे,शंकर राठोड,प्रकाश राठोड,उत्तम राठोड,गुलाब राठोड,सह तांडा वस्तीवरील बंजारा समाजाचे युवक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments