चाकूर शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध- आ.बाबासाहेब पाटील
शादीखाना व सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
चाकूर:(तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) शहराच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध असून चाकूरला लागेल तेवढा निधी मी देण्यासाठी तयार आहे असे प्रतिपादन चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर शहरातील रहेमत नगरमध्ये शादीखाना व लोकमान्य शाळेच्या पाठीमागे सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक करिम गुळवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे , जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव , माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे , सुभाष काटे, डॉ.एन. जी .मिर्झा, अॕड.डी.टी.पाटील, अॕड.संतोष गंभीरे, गणेश फुलारी, तुकाराम जाधव, गुणवंत जाधव , नगरसेवक इलियास सय्यद , राहूल सुरवसे, प्रा.बाळासाहेब बचाटे , प्रा,भिमराव साळवे , प्रा,अंगद बोबडे , प्रा,नानासाहेब पाटील , प्रा.लिंगराज जोगी , संदीप शेटे, राम फुले, सुरज शेटे,प्रा. दयानंद झांबरे, अलीम शेख, अनिल वाडकर, मधुकर कांबळे , रामदास घुमे, गणेश स्वामी, हरीश चव्हाण बिलाल पठाण, मतीन गुळवे, अजित शेख, समाधान जाधव, सचिन तोरे, कादिर जहागीरदार, पांडुरंग धडे, इंजिनीयर कांबळे , पवळे , विवेक शिंदे, युनूस सय्यद, शशिकांत शिंदे सह आदी उपस्थित होते.
चाकूर शहरातील विविध विकास कामासाठी आ.बाबासाहेब पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून रहेमतनगर येथे शादी खान्यासाठी २५ लक्ष रुपये तसेच शैलेश कोडे ते प्रा.भिमराव साळवे यांच्या घरासमोर रस्त्यासाठी पाच लक्ष रुपये निधी दिला आहे. तसेच नगर विकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रभाग दोन मध्ये नागनाथ फुलारी ते लातूर रोड सिमेंट रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये, नंदू पाटील यांचे घर नांदेड लातूर रोड सिमेंट रस्त्यासाठी २० लक्ष , अंगणवाडी ते लातूर नांदेड रोड सिमेंट रस्त्यासाठी ५ लक्ष आणि प्रभाग चार मध्ये आदर्श कॉलनीतील विठ्ठल रुक्मीनी मंदिर सभामंडपाकरीता १० लक्ष असे एकूण ६० लक्ष रुपयाचा निधी आ. पाटील यांनी मंजूर करुन आणला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी यांनी केले तर आभार नगरसेवक इलीयास सय्यद यांनी मानले.
0 Comments