Latest News

6/recent/ticker-posts

"इशारा" न्यूज चा दणका,औसा शहरास सुरळीत पाणीपुरवठा,सभापतींनी शब्द पाळला

"इशारा" न्यूज चा दणका,औसा शहरास सुरळीत पाणीपुरवठा,सभापतींनी शब्द पाळला



 


 


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)औसा नगरपालिकेकडुन शहरास सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची बातमी 'इशारा' वर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. "धरण उशाला व कोरड घशाला" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच स्थानिक प्रशासनाने बातमीची दखल घेत शहरात पाणीपुरवठा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले होते की आठ दिवसात सर्व तांत्रिक बिघाड दुरुस्त करून प्रति आठ दिवसाला एकदा शहराला पाणीपुरवठा केला जाईल तो शब्द त्यांनी जातीने लक्ष देऊन पाळला असल्याचे दिसून येते.


सुरूवातीला काही ठिकाणी थोडेसे घाण पाणी आल्याची चर्चा शहरात होती मात्र पाण्यात योग्य मात्रेत औषध टाकून स्वच्छ पाणी देण्याचा मानस पालिकेकडून केला गेला. या कार्याबद्दल सभापती गोविंद जाधव व पालिकेचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments