Latest News

6/recent/ticker-posts

विविध कामाच्या निविदे प्रकरणी उच्च न्यायालयाची औसा पालिकेस जोराची चपराक;भविष्यात बेरोजगार अभियंत्यांचे आरक्षण कायम

विविध कामाच्या निविदे प्रकरणी उच्च न्यायालयाची औसा पालिकेस जोराची चपराक;भविष्यात बेरोजगार अभियंत्यांचे आरक्षण कायम



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.३१ - औसा नगरपालिकेचे जवळपास पाच कोटी रुपयांचे वैशिष्ट्यपूर्ण कामाची निविदे प्रकरणी औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली. त्यात बेरोजगार अभियंता यांचा भविष्यात जी कामे होतील त्यात आरक्षण कायम ठेवत नगरपालिकेस चपराक दिली. मागील अनेक दिवसापासून पालिकेने पाच कोटींची विविध कामे करण्यासाठी निविदा काढली होती. या निविदेमध्ये स्थानिक बेरोजगार अभियंत्यांना 33 टक्के आरक्षण न ठेवता संपूर्ण काम खुल्या स्वरूपात करण्याचे निश्चित करून निविदा काढली होती.याप्रकरणी येथील बेरोजगार अभियंता संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती.या ठिकाणी दोन्ही बाजूचे म्हणणे सादर करण्यासाठी सुचित केले होते. अभियंता संघटनेचे शेख अजहर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून निविदे विरोधात अहवान दिले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यापुढे बेरोजगार अभियंत्यांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवत अभियंत्यांना न्याय दिला आहे. या निकालामुळे बेरोजगार अभियंता मध्ये आनंदाचे वातावरण आहे.



निकाल लागल्यानंतर शहरांमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. ही सत्य व हक्का ची लाढाई यशस्वी लढऊन हजारो सुशिक्षीत बेरोजगारानां न्याय मिळवुन दिल्या बद्दल 30 ऑक्टोंबर रोजी इंजीनिअर अजहर फकिरपाशा शेख यांचा अँड शाहनवाज पटेल व मिञ मंडळ तर्फे त्यांचा सत्कार करन्यात आले व फटाके फोडुन व पेढे वाटुन जल्लोष करन्यात आले. या वेळी अँड फय्यज पटेल, महुम्मद मुंगले, बाबा पटेल , सामाजिक कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला व ई हाजर होते.


Post a Comment

0 Comments