नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा
लातूर:(प्रतिनिधी) देवी कुषमांडाचे पुनरुत्पादन व निर्मितीचे तत्व अंगीकारून समाजाची अन्नदाता बनणाऱ्या आधुनिक नवदुर्गा महिला शेतकरी यांचा सन्मान एलआयसी कॉलनीतील जयश्री अर्जुन शेंडगे व मंगल भिवा शेंडगे यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने साडी चोळी व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष मीनाताई भोसले स्वामी दयानंद मंडलाच्या महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्षा सौ.रंजना निलंगेकर व महिला मोर्चाच्या सरचिटणीस शोभाताई कोंडेकर, चिटणीस सौ.कीर्ती स्वामी व परिसरातील महिला उपस्थित होत्या.
0 Comments