Latest News

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड देवणी चे भव्यधरणे आंदोलन

संभाजी ब्रिगेड देवणी चे भव्यधरणे आंदोलन



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) नो पंचनामा, फक्त स्पॉट पाहणी आणि तात्काळ सहकार्य अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान भरपाई चे पंचनामे करत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना तात्काळ बांधावरपिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी व मराठा आरक्षण तात्काळ स्थगिती उठून मराठा समाजाला न्याय देण्यात यावा संभाजी ब्रिगेड च्यावतीने वेळोवेळी निवेदन देवुनही अद्यापी शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी 50 हजार भेटलेच नाहीत पण आपले सरकार पंचनामे करण्याचे नाटक करीत आहे ही नाटकीय सोंग थांबवुन शेतकऱ्याच्या खात्यावर सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच मराठा आरक्षणाची स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी व मराठा मराठा समाजाला न्याय देण्यात यावे त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने टप्याटप्याने आंदोलन, जनक्रोश करण्यात आला होता करण्यात आला होता आता दुसरा टप्पा म्हणून दिनांक.२१-१०-२०२० मंगळवार रोजी तहसील कार्यालय देवणी येथे संभाजी ब्रिगेड च्या वतिने भव्य धरणे आंदोलन संभाजी ब्रिगेड च्या वतिने करण्यात आले सर्व शेतकरी बांधव मराठा बांधव व संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनास उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष अतुल काकडे जिल्हा सचिव राहुल अतनुरे तालुका अध्यक्ष रमेश बिरादार कार्याध्यक्ष प्रवीण अडे ता.उपध्याक्ष संभाजी कापडे,ता.सचिव ज्ञानेश्वर कोनाळे ता.उपध्याक्ष दिपक बेळकुणे ता.संघटक कृष्णा भोसले, शहर अध्यक्ष अनिल तळणीकर, सचिव रोहीत बंडगर, स्वप्निल बावगे, कृष्णा बिरादार, राजकुमार कोळ्ळे, शुभम गुंगेवाड, ओम भंगे, प्रशांत दारनुळे,शिवरत्न गुंगेवाड, किरण नागूरे,भरत गिरी, शंकर शिंदे, अंकुश कापडे, सर्व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments