Latest News

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्याचे खा.छञपती संभाजीराजे यांना निवेदन

संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्याचे खा.छञपती संभाजीराजे यांना निवेदन



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना बळ देण्याच काम तुम्ही करावे तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटवून मराठा समाजाला ओ.बी.सी मध्ये समाविष्ट करण्यात यावे व पिककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि सन2020-21मधील लोकसभेतील शेतकरी विरोधी विधेयक रद्द करून स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा व सन2020-21या वर्षीचा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपीकविमा मंजूर करण्यात यावा. अशा मागण्याचे निवेदन खा.छञपती संभाजीराजे यांना देण्यात आले तसेच निलंगा तालुक्यात आणि राज्यात अचानक आलेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळाणे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.पाणी आणि वादळाने बागायती आणि जिरायती दोन्ही शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्याचे आर्थिक अडचणीत वाढ होऊन कंबरडे मोडले आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ,शेतकरी जगाला तर देश जगेल आपण छत्रपती या नात्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची समन्वय साधून मराठवाड्यातील रयतेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रमोद कदम (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड निलंगा) अमोल माने, इरशाद शेख, नयन माने, प्रसाद झरकर,पेरमेश्वर बोधले ,बरमदे सर, सुबोध गाडीवान,अजित लाभे ,कृष्णा बिरादार, पवनराजे बिरादार आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


Post a Comment

0 Comments