Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी शासनावर दबाव आणू-देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी शासनावर दबाव आणू-देवेंद्र फडणवीस



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.20 - लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस औसा येथे आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व शासनाकडून तात्काळ मदत मिळावून देण्यासाठी आपण सरकारवर दबाव आनु व लवकरात लवकर मॉडेल मिळवून देऊ. असे नमूद केले. दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पावसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यु पवार तसेच निलंगा मतदार संघाचे संभाजी पाटील हे होते. मी अनेक वेळेला पूर पाहणी केली आहे .पण या वेळेला जशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तशी भयावह परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली नाही. मी मागच्या वर्षी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाल्यावर १०००० कोटी मदत घोषित केली होती. ही मदत चटकन जात आहे असा आरोप करणारे सध्या सत्तेत आहे त्यांनी किमान इतकी तरी मदत देऊन शेतकऱ्यावर आलेल्या संकटाला तोंड द्यावे. दिलेला शब्द विद्यमान सरकारने पाळावा असे म्हटले.


Post a Comment

0 Comments