महात्मा गांधी विचार मंच तर्फे राष्ट्रपित्यांना अभिवादन
औसा (जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख) महात्मा गांधी विचार मंच तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त दि. 2 ऑक्टोबर 2020 रोजी औसा येथील गांधी चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी विचार मंचची 23 वर्षांची अखंड परंपरा कायम ठेवून येथील कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औसा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशअप्पा ठेसे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून गांधीजींना अभिवादन करण्यासाठी महात्मा गांधी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील उटगे, राम कांबळे, दादा कोपरे, माजी नगरसेवक शेख शकील, रशीद शेख, सनाऊल्ला दारुवाले, मुक्तेश्वर पडसळगे, एस ए काझी, किशोर जाधव, मुक्तार मणियार, किशन कोलते, उमाकांत मुर्गे, नंदकुमार सरवदे, सिद्धेश्वर आपुणे, नंदकुमार देशपांडे, विनोद जाधव, मदनसिंह भिसेनी, रमेशअप्पा राचट्टे, दिलावर तत्तापुरे, सुरेश पंचाक्षरी, काशिनाथ सगरे, गौरीशंकर औटी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments