Latest News

6/recent/ticker-posts

उत्तर प्रदेशातील पीडित मुलीला चापोलीत श्रध्दांजली;ग्रामस्थांनी व्यक्त केला निषेध.

उत्तर प्रदेशातील पीडित मुलीला चापोलीत श्रध्दांजली;ग्रामस्थांनी व्यक्त केला निषेध.



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चापोली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर तिचा उपचारां दरम्यान मृत्यू झाला.या घटनेचा चापोली ता.चाकूर येथे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करून पीडित मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी येथील युवक रमेश पाटील यांनी घटनेतील दोषीनां कठोर शासन झाले पाहिजे व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना लवकरात न्याय मिळाला हवा असे मत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होणराव,चेअरमन बालाजी शेवाळे,माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव,ज्ञानेश्वर वाघमारे ,युवा सेना तालुकाध्यक्ष पांडुरंग बूंदराळे,,बालाजी कांबळे,नामदेव कांबळे,लक्ष्मण शेवाळे,राम गादगे,रामालिंग मुर्गे,विरभद्र गंगापूरे,सिद्धेश्वर गुळवे, भद्रीनाथ स्वामी, विशाल पवार,रमेश सरकाळे,निखिल फूलारी,पियूष पेद्देवाड,आकाश चाटे,आदि जणांनी श्रध्दांजली वाहून घटनेचा निषेध केला.


Post a Comment

0 Comments