Latest News

6/recent/ticker-posts

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला- अमित देशमुख

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला- अमित देशमुख



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख) मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून स्मृतिशेष खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला 'बंदिवान मी या संसारी' या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. तुझं आहे तुझ्यापाशी मधला 'श्याम' ही भूमिका त्याचबरोबर 'वासूची सासू, झोपी गेलेला जागा झाला, सौजन्याची ऐशी तैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके विशेष गाजली. त्याचबरोबर आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सात्विक अभिनयाचा अमीट ठसा त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविला.त्यांच्या निधनाने चाहत्यांना नव्वदच्या दशकातील सिनेमांचा काळ पुन्हा आठवला असून लाडक्या अभिनेत्याच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments