आमदार अभिमन्यू पवार यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचां पाहणी दौरा
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१८ - औसा मतदारसंघातील लिंबाळा व हरिजवळगा गावांना मा आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधत आढावा घेतला.व शासनाकडून सर्वोतपरी मदत मिळुन देऊ प्रसंगी वेळ आलीच तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू अशी ग्वाही दिली.
विद्यमान सरकार विरोधी बाकावर असताना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी त्यावेळेला केली होती.गेल्या वेळेपेक्षा या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ,त्यामुळे विद्यमान शासनाने हेक्टरी अधिकाधिक सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रयत्न करू व फळबागा यांच्यासाठी स्वतंत्र मागणी करू असे सांगितले.
यावेळी सोबत ज्ञानेश्वर वाकडे, परमेश्वर बिराजदार, बळवंत पाटील,धनराज होळकुंदे,सरपंच शाहुराज पाटील ,धनंजय पाटील, बालाजी पाटील जगदीश मुगळे,नायब तहसीलदार महापुरे,शिवाजी फुलसुरे, विठ्ठलराव पाटील, वैजनाथ माने, रमेश माने ,गोरख माने, सुभाष पवार, उद्धवराव माने,प्रकाश नीला,तानाजी जाधव,गोविंद हजारे, नारायण माने,शिवाजी माने, श्रीपाद माने, विरभद्र महाजन, बालाजी विठ्ठलराव माने, भिमराव माने,दिगंबर माने, गणेश पवार श्री विठ्ठल खांडेकर, रामदास बरकंबे, मारुती माने, विजयकुमार पाटील, गोपाळराव माने, राहुल माने, साहेबराव बेस्ते, लिंबराज हजारे, राजकुमार महाजन,किरण पाटील, राजपाल पाटील, संदीप पाटील,आकाश हिरे आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव तसेच कृषी,सार्वजनिक बांधकाम,जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments