Latest News

6/recent/ticker-posts

ना. वडेट्टीवारांचा निलंगा मतदार संघामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी 

ना. वडेट्टीवारांचा निलंगा मतदार संघामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी 



निटूर:(प्रतिनिधी) राज्याचे भूकंप पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार हे आज निलंगा मतदार संघामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते शिरूर अनंतपाळ येथून निटूरमोड येथे आल्यानंतर ग्रामस्थ व शेतकऱ्याने ना. वडेट्टीवारांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहीती दिली यावेळी कांही शेतक-यांनी कुजलेले व भिजलेले सोयाबीन आनून मंञी महोदयांना दाखवले .


परतीच्या पावसाने शेतक-यांची वाट लागली असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली . यावेळी शासन सर्व तो परी मदत करेल अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी ग्रामस्थांना दिली.यावेळी अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर,आ.धीरज विलासराव देशमुख, अभय साळूंकेे, सुरेंद्र धुमाळ, अनिल पाटील, दिनकर नाना निटूरे, अशोक हासबे, दिलीप हूलसुरे, मोहम्मद शेख, जबर चाऊस, प्रताप भोयबार, बशीद गस्ते इ. नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments