जि.प.शाळेतील विशाल फरताळेचे नीट परिक्षेत यश
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१८ - औसा तालुक्यातील भादेकराच्या आनंदात भर पडली आहे.ग्रा.पं. कार्यालय भादा येथे ग्राम पंचायत स्थापनेपासून लिपीक पदावर कार्यरत असणार्या नंदकुमार बाबुराव फरताळे यांचा मुलगा विशाल फरताळे याने वैद्यकिय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट 2020) मध्ये 720 पैकी 675 गुण घेवून देशात 910 वा क्रमांक पटकावला. भादा जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी असणाऱ्या विशालने नीट परिक्षेची तयारी नामांकित राजर्षी शाहू महाविदयालय,लातूर येथून केली.या स्पर्धेच्या युगामध्ये जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुद्धा मागे नाहीत हे विशालने आपल्या मेहनतीने सिद्ध करून दाखवून दिले,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ जिद्द ,चिकाटी , बुद्धिमता यांच्या बळावर हे यश मिळवता येते हे या ठिकाणी सिद्ध झाले.विशालने या यशाचे श्रेय शाहू महाविद्यालयाच्या अत्यंत सूक्ष्म नियोजन, उच्च दर्जाचे शिक्षण आणि शिस्तीला दिलं.यासाठी त्याने शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी,सिईटी सेल चे संचालक,मुख्य समन्वयक , सर्व समन्वयक,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.तसेच भादा येथील रहिवासी असलेले आणि व्यवसायाने शिक्षक असणारे कृष्णाथ रत्ने यांची मुलगी अंजली कृष्णाथ रत्नेस 611 गुण आणि भादा गावचे रहिवाशी अभियंता असणारे बालाजी नारायण शिवलकर यांचे चि,रवी बालाजी शिवलकर 590 गुण घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे गावासह तालुकाभर अभिनंदन केले जात आहे.
0 Comments