Latest News

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या व जिल्ह्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या व जिल्ह्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा!



केळगाव येथे मनसेचा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम


निलंगा:{प्रतिनिधी/इरफान शेख}लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन,उडीद,तूर,ऊस आदी शेतातील सर्व पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली आहे त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.अतिवृष्टी झाली आहे याची नोंद जर शासनाकडे आहे तर ती एक नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे पाहणी दौरे,पंचनामे,फुटकळ घोषणा या बाबी करून वेळ वाया न घालवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.शेवटी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हा रस्ता रोको तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन थांबवण्यात आला.


अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांचा महापूर येईल- डॉ भिकाणे


लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.शासनाने त्वरित मदत नाही केली तर अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्येचा महापूर येईल व त्यात हे सरकार वाहून जाईल असे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे म्हणाले.राज्यावरील आर्थिक संकटाचे बनावट कारण पुढे 


करून जर मदत करणार नसाल तर मनसे खळ खट्याक चा तीव्र प्रत्यय देऊ असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल,उपाध्यक्ष नजीर मुजावर,शहराध्यक्ष प्रदीप शेळके,जाकिर शेख,शरपू शेख,गणेश उसनाळे,इम्रान शेख,अबू सय्यद,प्रवीण परळे,रेवन कोकरे,शिवदर्शन काळे,पावन काळे,विनोद जकापुरे,शाफिक मुजावर,धनाजी राठोड कर,अरबाज पठाण,दत्ता काळे,नवीन पांढरे,पद्माकर पेठकर,मदार माकने, उस्मान शेख,अतुल शेख,उत्तम सूर्यवंशी, समीर शेख,ओम घोलप,जावेद शेख ,मेहबूब मुजावर,शिवाजी आडे,उत्तम राठोड,प्रकाश कांबळे,माधव कोकरे,सुभाष आडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments