जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त कोविड योध्यांचा सत्कार
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोना सारखा अति संसर्गजन्य रोग पूर्ण जगात थैमान घातला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. अशा कोरोना सारख्या महामारीच्या संकटात आपल्या परिवाराची व स्वतःच्या जीवाची परवा न करता जे सेवा बजावत आहेत त्यांना आज उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळी कोविड योध्यांचा सत्कार विकास माने (उपविभागीय अधिकारी,निलंगा ) गणेश जाधव(तहसीलदार निलंगा) ताकभाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ.सौंदळे सर(वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय ,निलंगा) डॉ.कदम(तालुका आरोग्य अधिकारी ,निलंगा) डॉ.सोळुंके, डॉ.पाटील, श्रीमती भाग्यश्री काळे, नागमे, श्रीमती यास्मिन मुल्ला, श्रीमती डॉ.शितल चव्हाण, श्रीमती डॉ.जयश्री माने, डॉ.वाढवणे सर , श्रीमती डॉ.रत्नप्रभा गणेश, श्रीमती सुरेखा माने, श्रीमती अंजुम सौदागर , श्रीमती निर्मला लिंबाळकर, शंकर म्हेत्रे, मनोज बरमदे,श्रीमती मायादेवी पवार,श्रीमती कल्याणी होनमुटे, रीना डूमलवाड, लक्ष्मण फुलसुंदर, दत्तात्रेय म्हेत्रे, आशिष माने, गोपाळ जाधव, विजय चव्हाण, आलगुडे मदार, मुजीब नासरजंग ई. कोविड योद्धा व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments