कायदेशीर हक्क व अधिकार लढ्यासाठी महिला सामर्थ्यशील चळवळी उभ्या केल्या पाहिजे
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) मौजे इंद्राळ या गावी ग्रामीण महिला विकास संस्था देवणी व ग्लोबल फंड फॉर वुमेन अस्मिता प्रकल्प च्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलासाठी, महिलांना संरक्षण देणारे कायदे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 संदर्भात आयोजित केलेल्या प्रशिक्षणा प्रसंगी प्रस्ताविका मध्ये सुखवास रामराव इसाळे यांनी महिलांना आवर्जून असे सांगितले की ;मकाम म्हणजे महिला किसान अधिकार मंच या नेटवर्कच्या माध्यमातून 24 राज्यांमध्ये मकान चे काम चालू आहे महिलांना जगण्याचा अधिकार आहे पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही त्यांना दुय्यम स्थान आपण पाहतो आहोत;मला समाजाला असा प्रश्न विचारायचं आहे की, आणखी महिलांचे घरावर व शेत/ सातबारा यावर नोंद का नाही संयुक्त मालकी कायदा पारित झाला असला तरी याबाबत महिलांमध्ये आणखी जाणीव-जागृती झाली नाही ;तेव्हा आपण सर्व महिलांनी याबाबतीत जागृत होऊन प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये एकटेपणाचा गंध वाटू नये कुटुंबात व समाजात वास्तव आहे की महिला विधवा झाली की त्या महिलेला त्या घरातील सासू सासरे नणंद भावे असा शब्दप्रयोग करतात की आमचंच गेलं तुला घरात ठेवून काय कामाचं जी महिला अहोरात्र शेतात घरात वेळेवर पोटाला भाकर वेळेवर न खाता ज्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पित केले शेवटी त्या महिलेला असा न्याय मिळतो हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो तरीपण आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आपणाला का चीड येत नाही? ,वरचा देवही आला तरी आपल्याला न्याय मिळणार नाही: म्हणून म्हणतो की आपल्या अधिकार व हक्क यासाठी महिला संघटनाच्या माध्यमातून लढा दिला पाहिजे. या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक अँड रुक्मीन सोनकांबळे मॅडम सुनिता ताई सूर्यवंशी भागीरथाबाई सुर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहेत्रे ज्ञानदीप महिला ग्राम संघ गटातील सर्व महिला व सी आर पी आम्रपाली कांबळे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण पार पाडले ,
0 Comments